(म्हणे) नमो अ‍ॅपवरही बंदी घाला ! – पृथ्वीराज चव्हाण, नेते, काँग्रेस

मुंबई – १३० कोटी भारतियांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून केंद्र शासनाने नुकतेच ५९ भ्रमणभाषमधील अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग पालटणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील आस्थापनांना पाठवणार्‍या नमो अ‍ॅपवरही बंदी घाला, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ३० जून या दिवशी ट्वीट करत केली आहे. (केंद्र शासनाने चीनच्या शत्रूला धडा शिकवण्यासाठी चीनची ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे देशभरात स्वागत होत असतांना याविषयी सकारात्मक न रहाता केवळ राजकारण आणि द्वेषापोटी असे ट्वीट करून पृथ्वीराज चव्हाण यांना यातून कोणता हेतू साध्य करायचा आहे ? – संपादक)