कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या महसुलात मोठी तूट

कोल्हापूर – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदीमुळे आर्थिक वर्षातील पहिल्या ३ मासांत महापालिकेच्या महसुलात ३० कोटी रुपयांची तूट आली आहे. ४३९ कोटींपैकी महापालिकेकडे २९ जूनपर्यंत ८० कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये राज्यशासनाकडून ३६ कोटी ८१ लाख रुपयांचा जी.एस्.टी. परताव्याचा समावेश आहे. महापालिकेकडे कररूपाने ४३ कोटीच जमा झाले आहेत.