आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांसमवेत चिंचपूर (नगर) येथील वीणेकरी शासकीय महापूजा करणार

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणार्‍या ६ वीणेकर्‍यांतील चिंचपूर (जिल्हा नगर) येथील वारकरी श्री. विठ्ठल बडे यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. प्रतिवर्षी मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजेचा मान दर्शन रांगेतून निवडलेल्या भाविकाला देण्यात येतो; परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे.

श्री. विठ्ठल बडे हे मागील ५-६ वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. मागील ३ मासांपासून दळणवळण बंदी असूनही त्यांची पूर्णवेळ मंदिरात वीणा वाजवण्याची सेवा चालू आहे.