संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पंढरीच्या दिशेने एस्.टी.तून प्रस्थान

पुणे – आज आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरकडे राज्य परिवहनाच्या (एस्.टी.) बसगाडीतून रवाना झाल्या. भजन झाल्यावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिराबाहेर नेण्यात आल्या आणि नंतर विठाई बसमधून पंढरीकडे रवाना झाल्या. आळंदी येथून २० मानकर्‍यांना संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या चलपादुकांसमवेत जाण्याची संधी मिळाली. दोन्ही बसगाड्यांना फुलांची सजावट केली होती. टाळ-मृदुंगाचा गजर करण्यात आला.