विशाखापट्टणम् येथे वायूगळतीमुळे २ जणांचा मृत्यू

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – येथे एका औषधनिर्मिती करणार्‍या आस्थापनामध्ये २९ जूनच्या रात्री वायूगळती होऊन यात २ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जणांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. मृत्यू झालेल्या व्यक्ती याच आस्थापनामध्ये काम करत होत्या. २ मासांपूर्वीही या शहरामध्ये वायूगळती होऊन त्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर १ सहस्रांहून अधिक लोक आजारी पडले होते.