केरळमधील ‘मोपला बंड’च्या नावाखाली सहस्रो हिंदूंचे हत्याकांड घडवणारा अहमद हाजी याच्यावर ३ चित्रपट काढणार

‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ या जिहादी विचारसणीच्या पक्षाचा पुढाकार !

  • याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने आवाज उठवून या चित्रपटाची निर्मिती रहित करण्यास भाग पाडले पाहिजे !
  • सध्या भारताचे चीनच्या कारवायांकडे लक्ष आहे; मात्र भारतातील धर्मांधांच्या या हिंदुविरोधी कारवायांकडेही सरकारी यंत्रणांनी वेळीच लक्ष देऊन त्यांचा बीमोड करावा. अन्यथा भारतात गृहयुद्धासारखी स्थिती उद्भवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये आणखी वेगळे काय होणार ? हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार होय !

भारताला तिसरे महायुद्ध आंतरबाह्य लढावे लागणार असल्याने त्याची सिद्धता आतापासूनच करणे आवश्यक !

‘सध्या चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत. शत्रूराष्ट्रांच्या कुरापतींमुळे तिसरे महायुद्ध कधीही भडकू शकेल, अशी स्थिती आहे. त्यासह भारतात धर्मांधांकडून भारतविरोधी कारवाया आणि हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाणही वाढले आहे. ही सर्व स्थिती पहाता भविष्यात भारताला तिसरे महायुद्ध आंतरबाह्य या दोन्ही स्तरांवर लढावे लागेल. यासाठी भारताने त्याची आतापासूनच सिद्धता करणे आवश्यक !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील मलबार प्रांतात ‘मोपला बंडा’च्या नावाखाली वर्ष १९२०-२१ मध्ये धर्मांधांनी उठाव करून असंख्य हिंदूंचे सामूहिक हत्याकांड घडवून आणले होते. या हत्याकांडाला पुढील वर्षी २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या निर्घृण हत्याकांडास उत्तरदायी असलेला मोपला धर्मांधांचा नेता वरियामकुनाथु अहमद हाजी याच्या चरित्रावर आधारित ३ चित्रपटांची निर्मिती केरळ राज्यात करण्यात येणार आहे. केरळमधील ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एस्.डी.पी.आय’चे) या जिहादी विचारसरणीच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे अबू यांनी वरियामकुनाथु अहमद हाजी याच्यावर चित्रपट काढण्याची सिद्धता केली आहे. पी.टी. कुन्हिमहंमद आणि आलो अकबर या २ निर्मात्यांनीही वरियामकुनाथु अहमद हाजी याचा गौरव करणारे चित्रपट निर्माण करण्याची घोषणा केली आहे.

व्ही. अहमद हाजी याला ‘स्वातंत्र्यवीर’ दाखवण्याचा प्रयत्न !

प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्रा. श्रीधर मेनन, प्रा. सी.आय. इसाक आणि एम्.जी.एम्. नारायणन् यांच्या मते ‘मोपला बंड’ हे मलबार भागात इस्लामी आतंकवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या हिंदूंच्या वंशविच्छेदाचा एक भाग होता. त्यालाच काही हिंदूविरोधी आणि धर्मांध हे ‘इंग्रजांविरुद्धचा लढा’ असे स्वरूप देत असून त्याद्वारे ते या चित्रपटांत बंडखोरांचा नेता वरियामकुनाथु अहमद हाजी यास ‘स्वातंत्र्यवीर’ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोपला बंडाचा इतिहास

१. खिलाफत चळवळीला पाठिंबा

पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजांनी तुर्कस्थानच्या खलिफाचे सर्व अधिकार काढून घेतले होते. त्यास विरोध म्हणून भारतातील मुसलमानांनी ‘खिलाफत’ चळवळ चालू केली. तिचा भारताशी काहीही संबंध नसतांनाही मुसलमानांचे लांगुलचालन करण्यासाठी मोहनदास गांधी यांनीही त्या चळवळीला पाठिंबा दिला होता. या चळवळीचा एक भाग म्हणून अली मुस्लियार आणि व्ही. अहमद हाजी या नेत्यांनी मुसलमानांची एक संघटना उभी केली.

२. मलबार प्रांतात ‘इस्लामी राष्ट्रा’ची घोषणा

अली मुस्लियार आणि व्ही. अहमद हाजी या जोडीने तेव्हा मद्रास राज्याचा भाग असलेल्या मलबार या प्रांतात ‘इस्लामी राष्ट्र’ स्थापन करण्याची घोषणा केली आणि इंग्रजांविरुद्ध बंड घोषित करून काही भागावर नियंत्रण मिळवले. अवघ्या ६ मासांच्या आत इंग्रजांनी हे बंड मोडून काढले.

३. ‘इस्लामी राष्ट्रा’त  हिंदूंचे सामूहिक शिरकाण आणि हिंदु महिलांवर अनन्वित अत्याचार

या ६ मासांच्या इस्लामी राजवटीत या भागातील हिंदूंचे सामूहिक शिरकाण करण्यात आले आणि हिंदु महिलांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले.

४. हिंदूंच्या हत्याकांडाची माहिती इंग्रजांनी दडपली

या शिरकाणाचे आणि अत्याचारांचे भीषण स्वरूप पूर्णपणे बाहेर आलेले नाही. त्याची व्याप्ती वर्णन करण्याच्या पलीकडची होती. त्याकाळी प्रसारमाध्यमे एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हती आणि जी होती त्यातील बहुतेक इंग्रजांची मंडलिक बनली होती. इंग्रजांनाही हिंदूंपेक्षा मुसलमान अधिक जवळचे वाटत असल्याने त्यांनी हिंदूंवरील अत्याचारांच्या बातम्या दडपून टाकल्या; मात्र त्यावेळचे मलबारचे उप-जिल्हाधिकारी सी. गोपालन् नायर यांनी या प्रसंगाचे विस्तृत वर्णन केले होते. त्याला त्या वेळचे जिल्हाधिकारी आर्.एच्. एलिस यांनी दुजोरा दिला होता.

५. हिंदुद्वेषी साम्यवाद्यांकडून ‘जमीनदार आणि गरीब जनता यांच्यातील लढा’, असा उल्लेख

हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेले सामूहिक हत्याकांड भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे हत्याकांड मानले जाते. त्यावेळच्या साम्यवाद्यांनी मात्र या हत्याकांडाला ‘जमीनदार विरुद्ध गरीब जनता यांच्यातील लढा’, असे म्हटले होते.

६. हे हिंदूंचे धर्मांतरच

स्वातंत्र्यसैनिक के.पी. केशव मेनन यांनी या प्रसंगाचे वर्णन ‘हिंदूंचे धर्मांतर करण्याची कृती’, असे सांगत ‘त्याचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता’, असे म्हटले आहे.