पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे नव्हे, तर अयोध्येत येऊन राममंदिराचे भूमीपूजन करावे ! – साधू-संतांची मागणी

अयोध्या (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे नव्हे, तर अयोध्येत येऊन राममंदिराच्या बांधकामाचे भूमीपूजन करावे, अशी मागणी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ आणि साधू-संत यांनी केली.

यासाठी पंतप्रधानांना पत्रही पाठण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत येण्याचे नियोजन होऊ शकलेले नाही. त्यामुळे भूमीपूजनाचा दिनांक निश्‍चित करण्यात आलेला नाही.