नांदेड येथील शिवारात १४ गोवंशीय मृतावस्थेत आढळलेे ः कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीनतेरा ! ‘हा कायदा निवळ नावापुरताच आहे’, हेच गोवंशियांच्या हत्यांच्या वाढत्या घटनांवरून लक्षात येते. यावर सरकार काय उपाययोजना करणार आहे ?

नांदेड – येथील शिवारात १४ गोवंशीय मृतावस्थेत आढळलेे असून संबंधितांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे. हे गोवंशीय नांदेड किंवा भाग्यनगर येथे कत्तलीसाठी नेत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री शशिकांत पाटील यांनी म्हटले आहे की, ‘जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाका असतांना अन्य वाहनांना अडवून त्यांची कसून चौकशी केली जाते; मात्र गोवंशियांची वाहने चौकशी न करताच सोडली जातात. संबंधित ठाणेदारांना हाताशी धरून गोवंशियांची वाहतूक चालू असते. यापूर्वी उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक गोवंशियांची चोरी झाली आहे; मात्र पोलिसांनी याविरुद्ध गुन्हा नोंदवलेला नाही. हे चिंताजनक असून पोलीस अधिकार्‍यांनी यात लक्ष घालावे.’