उत्तरप्रदेशमध्ये मातृभाषा हिंदी विषयात तब्बल ८ लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण

  • देशातील बहुतेक ठिकाणी मातृभाषेकडे दुर्लक्ष होऊन इंग्रजीचे स्तोम वाढले आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी इंग्रजीची गुलामगिरी मोडून मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
  • एवढी दयनीय स्थिती येईपर्यंत शिक्षक काय करत होते ? त्यांनी मुलांना हिंदी भाषेत प्रवीण करण्यासाठी काय केले ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या शिक्षण मंडळाने घेतलेल्या माध्यमिक आणि अन्य परीक्षांचे निकाल लागले असून त्यांत राज्यातील तब्बल ८ लाख विद्यार्थी मातृभाषा हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अल्पच आहे. गेल्या वर्षी ९ लाख ९८ सहस्र २५० विद्यार्थी हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाले होते. सुमारे २ लाख ३९ सहस्र विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाची प्रश्‍नपत्रिकाच सोडवली नाही, असे शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍याने सांगितले.’ शिक्षणतज्ञांच्या मते ‘यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे तिघेही उत्तरदायी आहेत. यांपैकी एकही जण हिंदी भाषेविषयी गंभीर नाही.’