‘राष्ट्रीय युवा हिंदू वाहिनी, गोवा प्रदेश’चा आपत्काळात जनसेवा केल्याविषयी सन्मान

पणजी – ‘मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट’ या नवी देहलीस्थित संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा हिंदू वाहिनी, गोवा प्रदेश’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेला कोरोनाच्या वैश्‍विक महामारीच्या कालावधीत केलेल्या समाजसेवेविषयी ‘कोरोना योद्धा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अविनाश तिवारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या सन्मानपत्रात म्हटले आहे की, ‘वैश्‍विक महामारी कोरोनाच्या कालावधीत आपल्या वतीने करण्यात आलेल्या समाजसेवेने मानवतेच्या दृष्टीने नवा आदर्श ठेवला आहे. पीडितांना साहाय्य करतांना आपण अथक परिश्रम केले आहेत. एका लढवय्याप्रमाणे काम केले आहे. यासाठी आम्ही आपले हार्दिक अभिनंदन करतो, तसेच ‘कोरोना योद्धा सन्मान’ पुरस्काराने आपला सन्मान करतो.’