माशेल (गोवा) येथील श्री देवकीकृष्ण रवळनाथ संस्थानकडून शासनाला ‘पीपीई किट्स’ देऊन साहाय्य

माशेल (गोवा) – येथील श्री देवकीकृष्ण रवळनाथ संस्थानच्या वतीने कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी शासनाला ‘पीपीई किट्स’ देऊन साहाय्य करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष गिरीश धारवाडकर यांनी ५०० ‘डिस्पोझेबल पीपीई किट्स’ २३ जूनला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपुर्द केले.