गुरुंचे कार्य विश्‍वव्यापक होत असल्याने मन आणि बुद्धी यांद्वारे पुष्कळ प्रगल्भ व्हा !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शक बोल !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘छोट्या छोट्या गोष्टी आता मनात ठेवून चालणार नाहीत आणि मनाला लावून घेणेही चालणार नाही. मनाच्या विचारांच्या कक्षा वाढवून पुढच्या टप्प्याला जाऊन गुरूंचे कार्य पुढे नेण्यासाठी ‘मी काय काय करू शकतो ?’, हे पहाणे आवश्यक आहे. व्यापकता येण्यासाठी आपले विचार केवळ स्वतःभोवती वा स्वत:च्या सेवेपुरते नकोत, तर गुरुकार्याच्या स्तरावर हवेत. प्रथम स्वत:च्या सेवेविषयी, नंतर आश्रमात आणि पुढे गुरूंच्या मनात आपल्याविषयी विश्‍वास निर्माण झाला पाहिजे. गुरूंचे कार्य विश्‍वव्यापक होत चालले आहे. आपल्यालाही आपल्या मनाच्या कक्षा व्यापक करायला हव्यात. मन आणि बुद्धी यांद्वारे पुष्कळ प्रगल्भ व्हा !’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२१.४.२०१७)