‘सत्यमेव जयते’ संघटनेच्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये सनातन संस्थेचा सहभाग

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित आणि समाजासाठी कार्य करणारी ‘सत्यमेव जयते’ ही संघटना ! देशात ‘सत्यमेव जयते’ राज्याची स्थापना व्हावी, यासाठी गोरखपूरमध्ये कार्यरत आहे. देशात कोरोना महामारीच्या संकटामुळे अधिकाधिक लोक गावाच्या दिशेने परत येत आहेत. अशा वेळी प्रत्येक आवश्यक वस्तूंची निर्मिती गावामध्येच करून गावे आत्मनिर्भर व्हावीत, यासाठी संघटनेने एक योजना बनवली आहे. त्याची कार्यवाही करण्यासाठी एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या बैठकीला ‘सत्यमेव जयते’ चे अध्यक्ष श्री. श्यामधर तिवारी, सनातन संस्थेचे श्री. प्रशांत वैती ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. या बैठकीला उत्तरप्रदेशातील विविध जिल्ह्यांतील २५ हून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.

सनातन संस्थेविषयी श्यामधर तिवारी यांचे गौरवोद्गार !

‘सत्यमेव जयते’चे अध्यक्ष श्री. श्यामधर तिवारी सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) असून सध्या गोरखपूर मंडलाच्या आयुक्त पदावर कार्यरत आहेत. या बैठकीत सनातन संस्थेविषयी ते म्हणाले, ‘‘सनातन संस्था एक मोठे कार्य करत आहे आणि आपणही संस्थेच्या या कार्याशी नेहमीच जोडलेले राहू.’’