मायमी, फ्लोरिडा येथील ४७४ गोमंतकीय खलाशी गोव्यात

पणजी – मायमी, फ्लोरिडा भारतीय खलाशांना घेऊन आलेले ‘नॉर्वेजीयन एस्केप’ हे जहाज २९ जून या दिवशी सकाळी मुरगाव बंदरात नांगरण्यात आले आहे. मायमी येथून जहाजाचा प्रवास २३ मेला प्रारंभ झाला होता. हे जहाज इटली आणि ग्रीसमार्गे भारतात आले आहे. या जहाजातून ४७४ गोमंतकीय खलाशी आले आहेत.