व्हॉट्सअ‍ॅप : धर्मप्रसाराचे एक अभिनव माध्यम

‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराची यशोगाथा !

वैयक्तिक संपर्क, धर्मशिक्षणवर्ग, सत्संग आदी माध्यमांद्वारे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा धर्मप्रसार चालू होता. दळणवळण बंदीच्या काळात मात्र यांवर बंधने आली. कोरोना महामारीच्या संकटात समाजात भीतीचे वातावरण होते. त्यावर मात करण्यासाठी समाजाला साधना सांगून लोकांचे आत्मिक बळ वाढवणे आवश्यक होते; पण त्यासाठी धर्मप्रेमी, भाविक, जिज्ञासू यांच्या संपर्कात रहाणे आवश्यक होते. अशा वेळी ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबूक’, ‘ट्विटर यांसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करून संस्था आणि समिती यांनी जनसंपर्क चालू ठेवला आणि त्याचे परिणामही सकारात्मक मिळाले.

दळणवळण बंदीच्या काळात काही लोकांकडून सामाजिक माध्यमांचा मनोरंजन, तसेच चुकीच्या कारणांसाठी वापर केला गेला; मात्र समाजहित हाच केंद्रबिंदू ठेवून  सामाजिक माध्यमांचा कौशल्याने वापर करून निराशा, भीती आणि चिंता यांनी ग्रासलेल्या समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य अभिनव म्हणावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे लाखो जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना धर्मसत्संगांचे निमंत्रण देऊन व्यापक प्रसार !

नामजप सत्संग, बालसंस्कार वर्ग, धर्मसंवाद आणि भावसत्संग यांचा अधिकाधिक जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, यासाठी त्यांच्यापर्यंत या सत्संगांची माहिती पोचणे आवश्यक होते. सध्या संपर्कासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे उत्तम साधन आहे. कुठलाही संदेश व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्यास तो संबंधितांपर्यंत हमखास पोचण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. हे लक्षात घेऊन संस्था आणि समिती यांच्या संपर्कात असणार्‍यांना या कार्यक्रमांची ‘लिंक’ पाठवून त्यांना सत्संगांमध्ये घेण्यात येणारे विषय, वेळा आदी रूपरेषा पाठवण्यात आली, तसेच या सत्संगांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारे लाखो लोकांपर्यंत या धर्मसत्संगांचा प्रसार करण्यात आला. आकडेवारीत सांगायचे झाल्यास १८ ते २४ मे या कालावधीत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे समाजातील ७ लाख ७० सहस्र २५९ जणांना कार्यक्रमांची ‘लिंक’ पाठवण्यात आली, तर साधकांच्या ७० सहस्र ९७७ नातेवाइकांनाही कार्यक्रामंची ‘लिंक’ पाठवली. एकूण विचार करता केवळ ७ दिवसांत एकूण ८ लाख ४१ सहस्र २३६ जणांना ‘लिंक’ पाठवण्यात आली.

धर्मसत्संगांना उपस्थित राहिल्यावर सनातनच्या कार्याला जोडण्याची इच्छा व्यक्त करणारे जिज्ञासू !

धर्मसत्संगांमध्ये घेण्यात येणारे विषय, त्यातील आशय आणि मांडणी ही जिज्ञासूंनाही भावली. त्यामुळे विविध माध्यमांद्वारे जिज्ञासूंनी या कार्यक्रमांविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

  • तुम्ही पाठवत असलेल्या कार्यक्रमांच्या ‘लिंक्स’ तसेच ‘नोटिफिकेशन’ मला मिळत आहेत. दळणवळण बंदी हटल्यावर मी सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो. – जयडू, पनवेल.
  • धर्मसत्संगांविषयीच्या ‘लिंक’ मला नियमित मिळत आहेत. संस्था आणि समिती राबवत असलेले कार्यक्रम हे चांगले आणि माहितीजन्य असतात. त्याविषयी तुमचे आभार. – अतीशा जतन, नवी पनवेल

वाचकांना विनंती

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या ऑनलाईन कार्यक्रमामुळे झालेले परिवर्तन, अनुभूती, अभिप्राय यांविषयी आम्हाला अवश्य कळवा.

पत्ता : ‘सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

ई-मेल : [email protected]

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक : ७४००३३९०२२