भाजपच्या ‘व्हर्चुअल’ सभेला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद

रत्नागिरी – २८ जून २०२० या दिवशी भाजप विभागाच्या ‘व्हर्चुअल’ सभेला स्मृती इराणी यांनी संबोधित केले. नवीन ‘डिजिटल’ माध्यमांचा उपयोग करत मोदी यांच्या दुसर्‍या कार्यकाळातील प्रथम वर्ष परिपूर्ती या पार्श्‍वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला स्मृती इराणी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.

‘फेसबूक लाईव्ह’, ‘वेबेक्स अ‍ॅप’, ‘यु ट्यूब’ या माध्यमातून या सभेशी जनता जोडली गेली होती. रत्नागिरी मध्येही या सभेला भरभरून प्रतिसाद मिळाला. आमदार प्रसाद लाड यांनी कोकणातील सभेच्या आयोजनाचे काम पहात ही सभा यशस्वी केली. रत्नागिरीमध्ये अनुमाने १० सहस्र घरातील लोकांनी सभेमध्ये सहभाग घेतला, अशी माहिती रत्नागिरी दक्षिण भाजपाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी दिली.