कोल्हापूर खंडपीठप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू ! – गृहमंत्री अनिल देशमुख

कोल्हापूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपिठाच्या स्थापनेसाठी प्रदीर्घ लोकलढ्याची पार्श्‍वभूमी आहे. कोल्हापूर खंडपीठाविषयी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करू, असे आश्‍वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. खंडपीठ नागरी कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची २८ जून या दिवशी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले. या वेळी विविध पक्ष, संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.