पंढरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला; मात्र पादुकांच्या नगर प्रदक्षिणेला अडचण नाही ! – सचिन ढोले, प्रांताधिकारी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे २७ जून या दिवशी प्रदक्षिणा मार्गावर १ कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे, असे असले तरी आषाढी एकादशीला पादुकांच्या नगर प्रदक्षिणेला कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आषाढी यात्रा भरणार नसली, तरी मानाच्या संतांच्या पादुका येथे येणार आहेत. कोरोनाबाधित व्यक्ती शिक्षक असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० हून अधिक जणांचे प्रशासनाने अलगीकरण केले आहे. या घटनेमुळे आषाढी यात्रेच्या नियोजनात कोणताही पालट झाला नसून वारकर्‍यांच्या शेकडो वर्षांच्या परंपरा पाळण्यात येणार असल्याचे सचिन ढोले यांनी सांगितले.