पैठण, त्र्यंबकेश्‍वर, मुक्ताईनगर यांसह १० मुख्य संस्थांच्या पादुका पंढरपूर येथे प्रस्थान करणार 

प्रतीकात्मक चित्र

नगर – आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाने विविध देवस्थान आणि संस्था यांच्या पायी दिंड्या न जाता केवळ पादुका घेऊन जाण्यास अनुमती दिली आहे. यामध्ये संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण), संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्‍वर), संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड), संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जळगाव), श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान (अमरावती), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू), संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान (आळंदी), संत नामदेव महाराज संस्थान (सोलापूर) आणि संत निळोबाराय संस्थान (पिंपळनेर, जिल्हा नगर) या मुख्य १० संस्थानांना पादुका पंढरपूर येथे नेण्यास अनुमती देण्यात आली आहे. यातील काही पादुका २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

या पादुका ३० जून या दिवशी एस्.टी. किंवा वाहन यांद्वारे पंढरपूर येथे घेऊन जाता येतील. पिंपळनेर येथील निळोबाराय पादुकांसमवेत जाणार्‍या २० जणांची प्रशासनाने कोरोना चाचणी केली असून त्यांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत, असे नगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले.