राज्यातील दळणवळण बंदीमध्ये ३१ जुलैपर्यंत वाढ !

मुंबई – राज्यात ३१ जुलैपर्यंत दळणवळण बंदी वाढवण्यात आली असल्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. यापूर्वी दळणवळण बंदी ३० जूनपर्यंत होती.

दळणवळण बंदीविषयी काही महत्त्वाचे नियम

१. सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी, प्रवासात ‘मास्क’ बंधनकारक.

२. सार्वजनिक ठिकाणी २ व्यक्तींमध्ये ६ फूट अंतर बंधनकारक.

३. दुकानात ५ हून अधिक ग्राहकांनी गर्दी करू नये.

४. लग्न किंवा अंत्यविधी यांना ५० हनू अधिक उपस्थिती नको.

५. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होईल.

६. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तंबाखू यांचे सेवन निषिद्ध असेल.

७. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘थर्मल स्क्रीनिंग’, ‘हँड वॉश’, ‘सॅनिटायझर’ आदी व्यवस्था बंधनकारक असेल.

महापालिकाक्षेत्रासाठी काही महत्त्वाचे नियम

१. ‘मॉल’ आणि ‘कॉम्प्लेक्स’ वगळता सर्व बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडतील.

२. आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती असावी.

३. सर्व खासगी कार्यालयांत १० टक्के किंवा १० कर्मचारी जे संख्येने अधिक असेल तेवढे कर्मचारी ठेवता येतील.

४. ‘टॅक्सी’, ‘कॅब’, रिक्शा, चारचाकी केवळ आवश्यक प्रवासासाठी उपलब्ध असेल. त्यात चालक आणि २ जण असे प्रवास करू शकतात. दुचाकीवर केवळ चालकाला अनुमती असेल.

५. वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास अनुमती असेल.

६. केशकर्तनालय, ‘स्पा’, ‘ब्युटी पार्लर’ यांना नियम पाळून कार्यरत रहाण्याची मुभा.

९. जिल्ह्यांतर्गत एस्.टी. गाड्यांमध्ये ५० टक्के प्रवाशांसह अनुमती.