पंढरपूरच्या वारीचा आरंभ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये

१ जुलै (आषाढ शुक्ल पक्ष एकादशी) या दिवशी पंढरपूर यात्रा असल्याच्या निमित्ताने लेखमाला…

कोरोना महामारीमुळे यंदाचा पालखीसोहळा न होता संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरमाऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या दिवशी बस अथवा हेलिकॉप्टर यांद्वारे पंढरपूरला विठुमाऊलीच्या भेटीसाठी नेण्यात येणार आहेत.

पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी

अ. वैकुंठरूपी पंढरपुराला जात असल्याने आनंदी झालेले वारकरी इतक्या आत्मीयतेने पांडुरंगाकडे का ओढले जातात ? आणि त्यांना इतका आनंद का येतो ? याविषयी सांगतांना संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘अरे पुंडलिका ! तू खरोखरच धन्य आहेस; कारण तू येथील भूतलावरील लोकांना सुख देण्याकरता या वैकुंठीच्या पांडुरंगाला पंढरपूरला आणून त्याला या विटेवर उभे केले आहेस. यावरून तुझे सामर्थ्य आणि तुझ्या तपस्येचा अंदाज येतो. एवढेच नव्हे, तर तू भगवान श्रीकृष्णाचा द्वापरयुगातील गोपी गोपाळांचा परिवार या कलियुगातील पंढरपूरला आणून संत आणि भक्त यांच्याद्वारे येथेही रासक्रीडेचा आनंद सर्वांना देत आहेस. तुझ्यामुळे जग धन्य झाले. तू वैकुंठच पृथ्वीवर आणलेस.’

त्यामुळे वारकर्‍यांना पृथ्वीवरील या वैकुंठाला जातांना अतीव आनंद होत असतो.

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’)