वेळवाडी, जामसंडे येथे मधमाशांच्या आक्रमणात एकाचा मृत्यू

देवगड – वेळवाडी, जामसंडे येथे आंब्याच्या कलमांची मशागत करणार्‍या कामगारांवर मधमाशांनी आक्रमण केले. यामध्ये नवलसिंह टमाटा (वय ६४ वर्षे, मूळचे नेपाळ) या कामगाराचा मृत्यू झाला, तर धोंडू दौलत कदम हे गंभीर घायाळ झाले. कदम यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. इतर कामगारांनी घटनास्थळावरून पलायन केल्याने ते वाचले आहेत.