वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सीमेतील शाळा गणेशचतुर्थीपर्यंत भरणार नाहीत

वेंगुर्ले – आगामी गणेशचतुर्थीच्या कालावधीत शहरांमधून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त येणार आहेत, तसेच आताही जिल्ह्याबाहेरून लोकांचे जिल्ह्यात येणे चालू आहे. त्यामुळे किमान गणेशचतुर्थीच्या कालावधीपर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सीमेतील शाळा संस्थात्मक विलगीकरणासाठी वापरात ठेवाव्यात, असा निर्णय नगरपरिषदेच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा झाली. या वेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक आदींसह प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.