महाराष्ट्रभरातील सर्व अनधिकृत मशिदी आणि भोंगे यांवर कारवाई केली नाही, तर आंदोलन उभारू ! –  महेश जाधव, अध्यक्ष, मराठी कामगार सेना, मनसे

मुंबई, २९ जून (वार्ता.) – मुंबईमध्ये सर्वत्र अनधिकृत मशिदी आणि भोंगे आहेत. शिवसेनेचे शासन असूनही त्यांवर कारवाई होत नाही. अल्पसंख्यांक म्हणून मुसलमानांची थेर खपवून घेतली जाणार नाहीत. महाराष्ट्रात एकही अनधिकृत मशीद आणि भोंगा असता कामा नये, ही मनसेची भूमिका आहे. महाराष्ट्रातील सर्व अनधिकृत मशिदी आणि अनधिकृत भोंगे यांवर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात आंदोलन करेल, अशी चेतावणी मनसेच्या मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. यासाठी मनसेकडून पाठपुरावा केला जाईल, असे या वेळी जाधव यांनी सांगितले.

महेश जाधव यांनी म्हटले आहे की,

मनसेच्या मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव

१. धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र मुसलमान हा आदेश मानत नाहीत. मुसलमानांनी अधिकृत मशिदी उभारायच्या, त्यावर भोंगे लावायचे, हे यापुढे चालणार नाही.

२. अनधिकृत मंदिरांवर कारवाई करणारे पोलीस आणि प्रशासन आता कुठे आहे ? आमच्या मंदिरांवर कारवाई झाली की, आम्ही गप्प बसायचे; मात्र अनधिकृत मशिदी आणि भोंगे यांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांची भूमिका ही दुटप्पी आहे.

३. प्रत्येक गोष्ट हिंदूंना समजावयाला जातात. हिंदूंनी काय सर्वधर्मसमभाव जपण्याचा ठेका घेतला आहे का ?

४. भोंग्यांवर अजान लावल्याविना तो पूर्ण होत नाही का ? सकाळी भोंगे लावून लोकांची झोपमोड करायची का ?

५. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, याचे डोस केवळ हिंदूंनाच का ? सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंसाठीच आहे का ? मुसलमानांनी त्याचे अनुकरण करावे.

… यापुढे करिश्मा हिला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर ठोकून काढू !

आम्ही करिश्मा हिची भेट घेतली. या लढ्यात राज ठाकरे तिच्या समवेत आहेत. घर सोडण्यासाठी अबू आझमी यांच्यासारखी माणसे तिला धमक्या देत आहेत. अशा फुटकळ लोकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. राज्यभरात मशिदींवर अनधिकृत भोंगे वाजतात. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही; पण अन्य धर्मियांना त्यामधून सवलत दिली जाते. मशिदींवर पहाटे ४ वाजता भोंगे वाजतात. त्याचा त्रास अन्यांना होत असतो. या विरोधात करिश्मा हिने आवाज उठवला आहे. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, तर गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे. अबू आझमी यांनी मर्यादेत रहावे. अन्यथा महाराष्ट्र सैनिक त्यांना ठोकून काढतील. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला धमकावण्याचा प्रयत्न करायचा नाही. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रविरोधी गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. आमदार असूनही महिलेविषयी अशा भाषेचा उपयोग करणारे अबू आझमी यांना लाज वाटायला हवी. यापुढे करिश्मा हिला कुणीही असा त्रास दिला, तर खपवून घेणार नाही. वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न केला, तर ठोकून काढू, अशी चेतावणी या वेळी महेश जाधव यांनी दिली.

आम्हाला साहाय्य करू इच्छिणार्‍यांनी अनधिकृत भोंग्यांना विरोध करावा ! – कु. करिश्मा भोसले

आता तरी जागे होऊन प्रशासनाने मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत !

मुंबई, २९ जून (वार्ता.) – आमची कुणाशी शत्रूता नाही. या भागात हिंदु-मुसलमान एकत्र रहातात; मात्र काही जण धर्माच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण करत आहेत. आम्ही इथे रहात आहोत आणि इथेच रहाणार. आम्ही सत्याच्या समवेत असून राज्यघटना आमच्या समवेत आहे. जे आम्हाला साहाय्य करू इच्छितात, त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अनधिकृत भोंग्यांना विरोध करावा, असे आवाहन कु. करिश्मा भोसले यांनी ‘ट्विटर’द्वारे केले आहे. मानखुर्द (नवी मुंबई) येथे मशिदीवरील भोंग्यांचा आवाज न्यून करायला सांगणारी धाडसी युवती कु. करिश्मा भोसले यांना तेथील धर्मांधांकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारानंतर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कु. करिश्मा भोसले यांची भेट घेऊन, तर अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे तिला पाठिंबा दर्शवला आहे.