खेड येथे ‘ऑनलाईन’ फसवणुकीद्वारे तरुणाला १ लाख ३३ सहस्र रुपये लुटले

रत्नागिरी जिल्ह्यात वाढती ‘ऑनलाईन’ फसवणूक

रत्नागिरी – खेड औद्योगिक वसाहतीतील संदीप कुमार दास या तरुणाची अनोळखी व्यक्तीने ‘गूगल पे अ‍ॅप’द्वारे १ लाख ३३ सहस्र ९५० रुपयांची ‘ऑनलाइन’ फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. दास यांनी खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संदीप दास यांनी ‘ब्ल्यूटूथ डिव्हाइस’ची ‘ऑनलाईन’ खरेदी केली होती. यानंतर त्यांच्या भ्रमणभाषवर अनोळखी इसमाने संपर्क करून ‘तुम्हाला १२ लाख २५ सहस्र रुपयांची ‘लॉटरी’ लागली आहे’, असे सांगून ‘रजिस्ट्रेेशन फी, जी.एस्.टी. आणि आर्.बी.आय. टॅक्स भरावे लागणार असल्याचे सांगून दास यांच्याकडून १ लाख ३३ सहस्र ९५० रुपये ‘गूगल पे अ‍ॅप’द्वारे वेगवेगळ्या खात्यात भरून घेतले.