चीनच्या टिक-टॉक, शेअरईट सहित ५९ ‘अ‍ॅप्स’वर भारत सरकारकडून बंदी

भारताने उशिरा घेतलेला चांगला निर्णय ! आता सरकारने चिनी वस्तूंच्या आयातीवरही बंदी घालावी, अशी जनतेची मागणी आहे !

नवी देहली – भारत सरकारने २९ जून या दिवशी चीनचे ५९ ‘अ‍ॅप्स’वर बंदी घातल्याची घोषणा केली आहे. या अ‍ॅप्समध्ये टिक-टॉक, शेअरईट, कॅमस्कॅनर, यूसी ब्राऊजर, हेलो, एमआय कम्युनिटी, व्हायरस स्कॅनर, क्लब फॅक्टरी, क्लॅश ऑफ किंग्ज, सीएम बाऊजर, ब्युट्री प्लस, यूसी न्यूज, क्यूक्यू म्युझिक, वीचॅट, क्यूक्यू न्यूजफिड, वेईबो, बीगो लाईव्ह, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, झेंडर, लाईकी आदींचा समावेश आहे.