(म्हणे) ‘आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार असल्याने चीनकडून कच्चा माल आयात करण्याची अनुमती द्या !’ – औषधनिर्मिती करणार्‍या आस्थापनांची केंद्र सरकारकडे मागणी

  • औषधनिर्मिती करणार्‍या आस्थापनांची पराभूत मानसिकता यातून दिसून येते. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्याऐवजी शत्रूराष्ट्रासमोर मान तुकवण्याची भाषा करणार्‍या औषध आस्थापना राष्ट्रहित काय साधणार ? अशा आस्थापनांमुळेच चीनचे फावते आणि तो भारतीय बाजारपेठेत घुसखोरी करतो !
  • कोरोना महामारीच्या काळात चीनने विविध देशांना पाठवलेले आरोग्य साहित्य निकृष्ट दर्जाचे होते, हे समोर आले आहे. आता भारताशी आणखीनच संबंध चिघळल्यावर तो आपल्याला चांगला माल पाठवेल, हे कशावरून ? चीनला ओळखण्यात भारतीय आस्थापने कशा प्रकारे घोडचूक करत आहेत, हेच यातून दिसून येते.
  • मुळात चीनशी व्यापार करणे, हा आत्मघात आहे. हे भारत सरकारने आधीच ओळखून यावर उपाययोजना केली असती, तर आज चित्र वेगळे असते. संकटे कितीही आली, तरी त्यावर उपाय, हा असतोच. हे ओळखून सरकारने आता तरी चीनशी व्यापारी संबंध तोडणे आवश्यक !  

नवी देहली – भारत आणि चीन यांच्यात संघर्ष चालू झाल्यापासून देशामध्ये चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मोहीम चालू झाली आहे. तसेच केंद्र सरकरकडे ‘चीनकडून साहित्य आयात करू नये’, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे चीनकडून येणारे साहित्य सध्या बंदरांवरच रोखण्यात आले आहे. यात औषधांचा कच्चा मालही आहे. कच्चा माल न मिळल्याने औषधांच्या निर्मितीवर परिणाम होऊ लागला आहे. यामुळे देशातील औषधांच्या आस्थापनांनी केंद्र सरकारकडे कच्चा माल आयात करण्याची अनुमती देण्याची मागणी केली आहे. ‘औषध क्षेत्रासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय चांगले आहेत; पण आत्मनिर्भर व्हायला वेळ लागेल’, असे औषध क्षेत्रातील आस्थापनांचे म्हणणे आहे.

चीनकडून आयात केला जाणारा औषधांचा कच्चा माल

सध्या औषधनिर्मितीसाठी चीनमधून मागवलेला कच्चा माल, द्रव्य, कोविड-१९ची उपकरणे आदी नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदर आणि देहली विमानतळ येथे अडकून पडली आहेत.

(सौजन्य : TOI)