विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही. आचार्य चाणक्य यांनी ‘केवळ भूमीपुत्रच स्वतःच्या मातृभूमीचे रक्षण करू शकतो’, असे म्हटले आहे, अशा शब्दांत भाजपच्या येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. येथे कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.

१. साध्वी प्रज्ञासिंह पुढे म्हणाल्या की, ‘काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे, ना संस्कार. २ देशांचे नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करू शकत नाही.’

२. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या टीकेवर मध्यप्रदेशातील काँग्रेसचे प्रवक्ते धनोपिया यांनी ‘प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत’, अशी टीका केली. (‘जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणार्‍या काँग्रेसी नेत्यांचे मानसिक संतुलन योग्य आहे’, असे काँग्रेसवाल्यांना वाटते का ? – संपादक)