तंबूला लागलेल्या आगीवरून भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये धुमश्‍चक्री झाली ! – केंद्रीय राज्यमंत्री व्हि.के. सिंह यांची माहिती

नवी देहली – लेफ्टनंट जनरल स्तरावरील ६ जूनच्या चर्चेत भारत आणि चीन यांच्यामध्ये  ‘दोन्ही देशांचे सैनिक सीमेजवळ थांबणार नाहीत’ असा निर्णय झाला होता; मात्र १५ जूनच्या सायंकाळी ‘कमांडिंग ऑफिसर’ सीमेवर टेहाळणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना ‘चिनी सैन्य पूर्णपणे परत गेलेले नाही’, असे दिसून आले. ‘पेट्रोलिंग पॉईंट १४’ जवळ चिनी सैन्याचा तंबू तसाच होता. त्यानंतर ‘कमांडिंग ऑफिसर’ने चिनी सैन्याला तंबू हटवण्यास सांगितले. चिनी सैन्य तंबू काढत असतांनाच अचानक त्याला आग लागली. ‘भारतीय सैनिकांनी आग लावली’, असे चिनी सैनिकांना वाटले आणि त्यामुळेच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. या वेळी दोन्ही देशांनी अधिक कुमक मागवली. या धुमश्‍चक्रीत चीनचे ४० पेक्षा अधिक सैनिक ठार झालेे, हे सत्य आहे, असे  माजी सैन्यदलप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्हि.के. सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.

( सौजन्य: आजतक )