पंजाबमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारण्याचे खलिस्तानी आतंकवाद्यांचे षड्यंत्र

अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना पोलिसांकडून संरक्षण

जिहादी असो कि खलिस्तानी सर्वांचे लक्ष्य हिंदूच आहेत, हे लक्षात घेऊन हिंदू आतातरी जागे होतील का ?

अमृतसर (पंजाब) – पंजाबमध्ये खलिस्तावादी आतंकवादी हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सिद्धतेत आहेत, अशी माहिती देहली येथे पकडण्यात आलेल्या ‘खलिस्तान लिबरेशन फ्रंट’च्या ३ आतंकवाद्यांच्या चौकशीतून समोर आली. या माहितीनंतर पंजाब पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्य, विशेषतः अमृतसर येथील हिंदुत्वनिष्ठाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तसेच गुप्तचर यंत्रणांकडून लक्ष ठेवले जात आहे.

१. देहली पोलिसांनी मोहिंदर पाल सिंह, गुरतेज सिंह आणि लवप्रीत सिंह यांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्यांनी अमृतसरचे शिवसेनेचे नेते आणि डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांचा एक अनुयायी यांना ठार मारण्याचा कट रचला असल्याचे पोलिसांना सांगितले होते.

२. पंजाबमधील हिंदुत्वनिष्ठ नेते सुधीर सुरी जामिनावर सुटल्यावर त्यांना खलिस्तानी आतंकवाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांना १२ सुरक्षारक्षकांचे  संरक्षण पुरवण्यात आले आहे. ‘ब्राह्मण कल्याण मंच’चे संस्थापक नरेश धामी आणि ‘हिंदु धर्म सत्कार कमेटी’चे प्रमुख यांनाही संरक्षण देण्यात आले आहे.