कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत आरोग्य सेवा मिळण्यातील चांगले किंवा कटू अनुभव कळवा !

साधकांना सूचना आणि वाचकांना नम्र विनंती

सध्या भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्ययंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांवर उपचार करत आहेत, तसेच त्यांना आरोग्य सेवा देत आहेत.

आरोग्ययंत्रणा मोठ्या प्रमाणात सेवा देऊन आपले कर्तव्य बजावत असतांना काही रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब मात्र ही परिस्थिती योग्य रितीने हाताळत नसल्याचे आढळून आले आहे. रुग्णांना आवश्यक सुविधा न पुरवणे, त्यांच्याकडून अवाजवी शुल्क आकारणेे अथवा खोटे तपासणी अहवाल देणे, अशा तक्रारी आरोग्य साहाय्य समितीस प्राप्त झाल्या आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत काही चांगले अथवा कटू अनुभव आले असल्यास कृपया आरोग्य साहाय्य समितीस खालील पत्त्यावर कळवावे.’

आपले अनुभव कळवण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, श्री सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]