लोरे येथे वीज अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

वैभववाडी – शेतात काम करत असतांना दुधमवाडी, लोरे येथे वीज अंगावर पडून लवू वसंत मांडवकर या तरुणाचा मृत्यू झाला. लवू मांडवकर हे दळणवळण बंदीच्या काळात मुंबईहून कुटुंबियांसह गावाला आले होते. त्यांचा संस्थात्मक अलगीकरणाचा कालावधी संपून ते घरी गेले होते. शेतीची कामे चालू असल्याने ते २ दिवसांपासून शेतात भात लावणीच्या कामाला जात होते. २७ जूनला सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चालू झाला. त्या वेळी विजेचा लोळ अंगावर कोसळल्याने मांडवकर यांचा जागीच मृत्यू झाला.