नेपाळी सैन्याकडून बिहार सीमेवरील भारतीय भूभागावर नियंत्रण

सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात  

नेपाळच्या वाढत्या कुरापती पहाता भारताने आता त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे अन्यथा तो डोईजड होण्याची शक्यता आहे !

वाल्मीकनगर (बिहार) – येथील भारतीय भूभाग असणारा सुस्ता हा प्रदेश नेपाळने कह्यात घेतला असून त्याने येथे येण्यास भारतीय नागरिकांवर बंदी घातली आहे. या भागात ७ सहस्र १०० एकर भूमीचा वाद चालू आहे, तसेच नेपाळने येथील नरसही जंगलावरही दावा केला आहे. कोरोनाचे ‘अलगीकरण केंद्र’ उघडण्याच्या नावाखाली नेपाळने त्याचे सैन्य या भागात आणले आहे.

भारतीय हद्दीत चीन ने नेपाळी सैनिकांसाठी उभारलेले तंबू

नेपाळ सीमेवर नेपाळी सैन्याकडून ४०० चिनी तंबू

बिहार सीमेवर जागोजागी चिनी तंबूत नेपाळचे सशस्त्र सैनिक दिसत आहेत. असे सुमारे ४०० चिनी तंबू येथे उभारण्यात आले आहेत. सीमेवर प्रत्येक १०० मीटरवर नेपाळी सैनिक तैनात आहेत. १ सहस्र ७५१ कि.मी. लांबीच्या सीमेवर नेपाळच्या सशस्त्र दलांनी २२० नव्या चौक्या उभारण्याची सिद्धता चालू केली आहे.

(सौजन्य : ABP NEWS)

नेपाळच्या कुरापती

१. नरकटियागंज भागातील भिखनाठोडीमध्ये येणार्‍या २ जलप्रवाह नेपाळने अडवले आहेत. नेपाळ भारतीय चौक्यांना होणारा पाणीपुरवठा थांबवू पहात आहे; मात्र प्रत्यक्षात या चौक्यांना कूपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो.

२. गंडक नदीच्या भारतीय बाजूच्या किनार्‍यावर सुस्ता गावात नेपाळने पुलाचे बांधकाम चालू केले. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर हे काम नेपाळने थांबवले आहे.

३. जूनच्या प्रारंभी वाल्मीकिनगर भागात त्रिवेणी घाटाजवळ एका बंधार्‍यास नेपाळने विरोध केला होता. भारताने खडसावल्यावर सध्या नेपाळ शांत आहे.

४. नेपाळने भिट्ठामोड भागात भारताने चालू केलेल्या ‘अ‍ॅप्रोच’ मार्गावर आक्षेप घेतला आहे.

नेपाळमुळे बिहारला पुराचा धोका

नेपाळ-भारत सीमेवरून बिहारला नेहमीच पुराचा धोका असतो. प्रतिवर्षी यासाठी नेपाळमध्ये उपाययोजना केल्या जातात. यंदा मात्र नेपाळने येथे तटबंदी करण्यास आक्षेप घेतल्याने बिहारमध्ये पुराचा धोका आहे.