सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना ‘महर्षि अध्यात्म विश्वाविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेले आध्यात्मिक संशोधन

नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना मिळालेल्या ‘दैवी प्रचीती’ आणि त्यांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेले आध्यात्मिक संशोधन

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक चाचणी

‘देवीचे महत्त्व सांगतांना शंकराचार्य म्हणतात, ‘‘शक्ति विना शिव हा ‘शव’ आहे.’’ देवी म्हणजे सर्व ब्रह्मांडाचे पोषण करणारी आदिशक्ति जगद्जननी ! चराचरात शक्ति विभिन्न रूपात दडलेली असते. यामुळे हिंदु धर्मात देवीचे ‘निद्रा’, ‘क्षुधा’, ‘लक्ष्मी’, ‘शांती’, ‘क्षमा’ असे विविध प्रकारे उल्लेख केले आहेत. चराचरात दडलेल्या शक्तीच्या विविध रूपांची उपासना हिंदु धर्मात सांगण्यात आली आहे, उदा. जल, वृक्ष, पर्वत, पशू यांच्यातील देवत्व ग्रहण होण्यासाठी त्यांचे पूजन करणे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठा होतांना चराचरात दडलेल्या देवीतत्त्वाच्या माध्यमातून काही दैवी प्रचीती मिळाल्या. त्यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेले आध्यात्मिक संशोधन पुढे देत आहे.

श्री भवानीदेवीच्या अनाहतचक्रावर अंगठा ठेवून प्राणप्रतिष्ठापना करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना विधीची पूर्वसिद्धता चालू असतांना तेथे खेकडा आढळणे

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना विधीची पूर्वसिद्धता चालू असतांना (सकाळी अंदाजे ९.१५ वाजता) तेथील मंदिर परिसरात एक छोटा खेकडा आढळला. आश्रमातील मंदिराचा भाग सर्व बाजूंनी बंदिस्त असल्याने तेथे खेकडा येण्यास स्थुलातील काही कारण नव्हते. आतापर्यंत आश्रमातील वास्तूमध्ये खेकडा कधीही आढळला नव्हता.

१ अ. श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना मंदिर परिसरात आढळलेल्या खेकड्याची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी : मंदिर परिसरात आढळलेल्या खेकड्याच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी डबी हातात धरून १५ ते २० सेकंद डबीत ठेवलेल्या खेकड्याचे निरीक्षण केले. संतांनी निरीक्षण केल्याचा खेकड्यावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी खेकड्याच्या पुन्हा मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. खेकड्याच्या केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

टीप – खेकड्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात . . .

१. खेकड्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२. सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी मंदिर परिसरात सापडलेल्या खेकड्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ४.३५ मीटरने वाढ झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

३. वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धूलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची किंवा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ अनुमाने १ मीटर असते. परात्पर गुरु डॉक्टरांनी मंदिर परिसरात सापडलेल्या खेकड्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याच्या एकूण प्रभावळीत ६.४८ मीटरने वाढ झाली. हेही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

चाचणीचा निष्कर्ष : मंदिर परिसरात सापडलेल्या खेकड्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी निरीक्षण केल्यानंतर त्याच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत लक्षणीय वाढ झाली. हा संतांमधील चैतन्याचा परिणाम आहे.

१ आ. श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना मंदिर परिसरात खेकडा आढळण्याचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन

१ आ १. रामनाथी येथील सनातनच्या आश्रम-परिसरात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या स्थापनेचा इतिहास

अ. श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आज्ञेने पौष कृष्ण दशमीला (१९.१.२०२० या दिवशी) श्री भवानीदेवीच्या मूर्तीची सनातनच्या आश्रम-परिसरातील देवळीत (देवतेच्या लहान मंदिराला ‘देवळी’ असे म्हणतात.) स्थापना करण्यात आली होती.

आ. २६.२.२०२० या दिवशी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी आणि प.पू. श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी यांचे आश्रमात आगमन झाले. देवळीतील श्री भवानीदेवीच्या मूर्तीकडे पाहून महास्वामीजींनी सांगितले की, ‘श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी आहे.’ श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने तिच्या मुकुटाच्या टोकाने श्री भवानीदेवीच्या अनाहतचक्राला स्पर्श केला.

इ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी असल्याचे कळल्यावर त्याविषयी जाणकारांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांनी ‘मंदिर-स्थापत्य’ शास्त्रानुसार (मंदिर बांधण्याचे वास्तूशास्त्र) थोड्या मोठ्या आकाराचे नवीन मंदिर बांधून त्यामध्ये देवीची पुनर्स्थापना करण्यास सांगितले. त्यानुसार आश्रम-परिसरात श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराचे बांधकाम करण्यात आले.

ई. देवतेच्या मूर्तीची एका मंदिरातून दुसर्‍या मंदिरात पुनर्स्थापना करावयाची असल्यास मूर्तीला तेथून हालवण्यापूर्वी मूर्तीवर ‘तत्त्व उतरवणे’ हा विधी करणे आवश्यक असते. सनातन-पाठशाळेतील पुरोहित-साधकाने श्री भवानीदेवीच्या मूर्तीवर ‘तत्त्व उतरवणे’ हा विधी केला. त्यानंतर देवीची मूर्ती देवळीतून बाहेर काढतांना मूर्तीखाली पाणी लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

१ आ २. नूतन मंदिरात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना तेथे खेकडा आढळणे, हे देवीचे तत्त्व आकृष्ट होत असल्याचा शुभसंकेत असणे : नूतन मंदिरात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापनाची पूर्वसिद्धता चालू असतांना तेथे मंदिर परिसरात खेकडा आढळला. याचे कारण हे की, श्री भवानीदेवीचे तत्त्व आपतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे देवळीच्या जीर्णोद्धारासाठी देवीची मूर्ती देवळीतून बाहेर काढतांना मूर्तीखाली पाणी असल्याचे दिसून आले. देवीच्या अस्तित्वाने तिच्या मूर्तीखाली आपोआप पाणी लागले, हे पाणी म्हणजे देवीचे ‘चरणतीर्थ’ होय.

एखादी घटना स्थुलातून घडण्यापूर्वी सूक्ष्मातून घडलेली असते. नूतन मंदिरात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठा व्हावी, यासाठी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचा संकल्प असल्याने ती क्रिया सूक्ष्मातून चालू होती. याची प्रचीती मंदिर परिसरात खेकडा आढळणे, या घटनेतून मिळाली. वैज्ञानिक उपकरणांनी करण्यात आलेल्या चाचणीतही खेकड्यात सकारात्मक ऊर्जा असणे, हे ती ‘दैवी प्रचीती’ असल्याचे सिद्ध करते. दैवी प्रचीती मिळणे, यालाच हिंदु धर्मात ‘शुभसंकेत’ म्हटले गेले आहे.

२. स्थुलातील काही कारण नसतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातात आपोआप एक अक्षता येणे

सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना विधीची पूर्वसिद्धता चालू होती. त्या वेळी (सकाळी सुमारे १०.१० वाजता) शेजारील खोलीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या कु. प्रियांका लोटलीकर या साधिकेशी बोलत होत्या. त्या वेळी त्यांनी त्यांचा उजवा हात सहज फिरवल्यावर त्यांचा हातात एक अक्षता आली. या खोलीचा उपयोग सत्संगासाठी होत असल्याने तेथे कुठूनही न शिजलेला तांदुळाचा कण, म्हणजे अक्षता येण्याची शक्यता नाही. आपोआप मिळालेल्या या अक्षतेची चमकही अधिक आहे, असे लक्षात आले.

२ अ. श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातात आपोआप आलेल्या अक्षतेची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

टीप – अक्षतेमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात . . . 

१. चाचणीतील अक्षतामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२. सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सर्वसामान्य अक्षतांच्या (२.६१ मीटर) तुलनेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातात आपोआप आलेल्या अक्षतेच्या (८.४४ मीटर) सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५.८३ मीटरने अधिक आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

३. वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात. सर्वसामान्य अक्षतांच्या (४.५७ मीटर) तुलनेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातात आपोआप आलेल्या अक्षतेची (११.६४ मीटर) एकूण प्रभावळ ७.०७ मीटरने अधिक आहे. हेही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

चाचणीचा निष्कर्ष : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातात आपोआप आलेल्या अक्षतेमध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने तिच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

२ आ. श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हातात आपोआप अक्षता येणे या घटनेमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन

२ आ १. अक्षतांचे महत्त्व

२ आ १ अ. अक्षतांमध्ये देवतांच्या लहरी आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असणे : ‘अक्षतांमध्ये ब्रह्मांडातील पाच देवतांच्या (गणपति, श्री दुर्गादेवी, शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण) तत्त्वांच्या लहरी आकृष्ट करण्याची, तसेच त्या जागृत करून कार्यरत करण्याची आणि पृथ्वी अन् आप या तत्त्वांच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.

२ आ १ आ. पांढर्‍या अक्षतांचे महत्त्व : पांढर्‍या अक्षता हे ईश्‍वराच्या प्रकट निर्गुण तारक शक्तीचे प्रतीक आहे. मूळ उच्च देवतांच्या तत्त्वांच्या लहरी आकृष्ट करण्यासाठी पांढर्‍या रंगाच्या अक्षता वापरतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पूजासाहित्याचे महत्त्व’)

२ आ २. समष्टी संतांकडून ईश्‍वरेच्छेने प्रक्षेपित होणार्‍या शक्तीमुळे त्यांच्याभोवती आपोआप विविध दैवी वस्तू मिळणे : ‘समष्टी संत ईश्‍वरेच्छेने कार्य करतात. यामुळे ज्या वेळी समष्टीसाठी दीर्घकाळ आणि सगुण स्तरावरील चैतन्याची आवश्यकता असते, त्या वेळी संतांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा पंचतत्त्वांवर परिणाम होतो. या प्रक्रियेमुळे संतांच्या देहातून किंवा त्यांच्या जवळपास आपोआप विविध दैवी वस्तू मिळण्याची घटना घडतेे, उदा. यज्ञाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून द्रव येणे, त्यांच्या झोपण्याच्या पलंगावर आपोआप अक्षता मिळणे इत्यादी.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०१९, दुपारी ३.१५)

२ आ ३. सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वैशिष्ट्ये : सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उच्च पातळीच्या ‘समष्टी-संत’ आहेत. नाडीपट्टीत महर्षींनी त्यांचा उल्लेख ‘महालक्ष्मीचा अंश आणि भूदेवीचा अवतार’, असा केला आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना देवीतत्त्व मिळावे आणि त्यांच्यातील देवीतत्त्वाचा लाभ साधकांनाही व्हावा; म्हणून महर्षींनी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’, असे त्यांचा उल्लेख करायला सांगितले आहे.

२ आ ४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातावर आपोआप अक्षता येण्यामागील शास्त्र : सर्वसामान्य व्यक्तीच्या हातातून २४ घंटे (तास) प्राणशक्ती प्रवाहित होते. आध्यात्मिक उन्नती झाल्यावर प्राणशक्तीसमवेत चैतन्य इत्यादी उच्च लहरीही संतांच्या हातातून प्रक्षेपित होऊ लागतात. सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उच्च पातळीच्या ‘समष्टी संत’ असून त्यांचा आध्यात्मिक अधिकारही मोठा आहे. त्यांच्यात प्रामुख्याने महालक्ष्मीतत्त्व, म्हणजेच देवीतत्त्व आहे. श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना होतांना त्यांच्यातील देवीतत्त्वातही वाढ झाली. त्या समष्टी संत असल्याने त्यांच्यातील वाढलेले देवीतत्त्व त्यांच्या हातातून समष्टीसाठी प्रक्षेपित होत होते. ईश्‍वराने समष्टीला या प्रक्रियेची प्रचीती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातावर आपोआप अक्षता मिळणे, या घटनेच्या माध्यमातून दिली. अक्षतांमध्ये देवीतत्त्व आकर्षित करण्याची, तसेच त्या जागृत करून कार्यरत करण्याची आणि पृथ्वी अन् आप या तत्त्वांच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्याची क्षमता असते. यातून ईश्‍वराने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आध्यात्मिक स्तरावर चालू असलेल्या कार्याची अनुभूती समष्टीला दिली आहे.

२ इ. निष्कर्ष : वरील विवेचनातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उजव्या हातावर आपोआप आलेली अक्षता सर्वसामान्य नसून ‘दैवी’ असल्याचे सिद्ध होते.

३. नूतन मंदिरात श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या संकल्प होतांना आश्रम-परिसराला लागून असलेल्या झाडावरील फळ आपोआप आश्रमाच्या आवारात खाली पडणे

सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना विधीच्या अंतर्गत नूतन मंदिराच्या उजव्या बाजूला संकल्प विधी चालू होता. त्या वेळी आश्रम परिसराला लागून असलेल्या झाडावरील फळ आपोआप आश्रमाच्या आवारात खाली पडले.

३ अ. नूतन मंदिरात श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा संकल्प होतांना आश्रम-परिसराला लागून असलेल्या झाडावरील फळ आपोआप आश्रमाच्या आवारात खाली पडणे, या घटनेचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन : महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ठिकाणी ‘देवीला कौल लावणे’, म्हणजे मनातील शंकासंदर्भात देवाला विचारणे ही पद्धत रूढ आहे. यामध्ये भक्तांनी प्रार्थना केल्यावर देवी फूल पाडून किंवा विविध माध्यमांतून भक्तांच्या मनातील प्रार्थना, प्रश्‍न आणि शंका यांचे उत्तर सांगते. श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या संकल्प होतांना त्यात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महामृत्यूयोगापासून रक्षण व्हावे’, अशी प्रार्थना अंतर्भूत होती. ‘परात्पर गुरु डॉक्टरांवरील महामृत्यूयोगाचे संकट दूर व्हावे’, या प्रार्थनेचे उत्तर आश्रमाच्या आवारात फळ पाडून देवीने दिले.

‘फळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढणे, देहात वाढलेले अतिरिक्त लोहाचे प्रमाण उणावणे, हाडांचे विकार बरे होणे आदी विविध लाभ होतात’, असे म्हटले जाते. महामृत्यूयोगाच्या संकटामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे हेच सर्व विकार वाढले आहेत. यातून देवीने प्रचीती देण्याचे माध्यमही किती परिपूर्ण निवडले, याची प्रचीती मिळते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.