रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम-परिसरातील देवळीतील (देवतेचे लहान मंदिर) श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली लागलेल्या पाण्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक चाचणी

वस्त्रालंकारांनी सजवलेली श्री भवानीदेवीची मूर्ती
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

१. रामनाथी येथील सनातनच्या आश्रम-परिसराच्या देवळीतील श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी लागल्याचे समजणे

‘श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आज्ञेने पौष कृष्ण दशमीला (१९.१.२०२०) या दिवशी श्री भवानीदेवीच्या मूर्तीची सनातनच्या आश्रम-परिसरातील देवळीत (देवतेच्या लहान मंदिराला ‘देवळी’ असे म्हणतात.) स्थापना करण्यात आली. २६.२.२०२० या दिवशी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी आणि प.पू. श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी यांचे आश्रमात आगमन झाले. या वेळी देवळीतील श्री भवानीदेवीच्या मूर्तीकडे पाहून महास्वामीजींनी सांगितले की, ‘श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी आहे.’ श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने तिच्या मुकुटाच्या टोकाने श्री भवानीदेवीच्या अनाहतचक्राला स्पर्श केला.

२. जाणकारांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रामनाथी आश्रमाच्या परिसरात श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराचे बांधकाम आरंभ होणे

श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी असल्याचे कळल्यावर त्याविषयी जाणकारांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांनी ‘मंदिर-स्थापत्य’ शास्त्रानुसार (मंदिर बांधण्याचे वास्तूशास्त्र) थोड्या मोठ्या आकाराचे नवीन मंदिर बांधून त्यामध्ये देवीची पुनर्स्थापना करण्यास सांगितले. त्यानुसार आश्रम-परिसरात श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराचे बांधकाम करण्यात आले. नूतन मंदिरात श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना करून पुनर्स्थापना करण्यात आली.

३. श्री भवानीदेवीच्या मूर्तीवर ‘तत्त्व उतरवणे’ हा विधी करण्यात येणे

जसे प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी देवतेच्या मूर्तीवर ‘तत्त्व चढवणे’ हा विधी केला जातो, तसे त्या मूर्तीची दुसर्‍या मंदिरात पुनर्स्थापना करावयाची असल्यास तिला तेथून हालवण्यापूर्वी मूर्तीवर ‘तत्त्व उतरवणे’ हा विधी करणे आवश्यक असते. सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी श्री भवानीदेवीच्या मूर्तीवर ‘तत्त्व उतरवणे’ हा विधी केला. त्यानंतर देवीची मूर्ती देवळीतून बाहेर काढतांना मूर्तीखाली पाणी लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

४. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली लागलेल्या पाण्याच्या संदर्भात वैज्ञानिक उपकरणाद्वारे संशोधन करण्यात येणे

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली लागलेल्या पाण्याचा नमुना गोळा करून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने  एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचेे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

४ अ. चाचणीचे स्वरूप : या चाचणीत श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील पाणी, तसेच मूर्तीच्या खालील माती आणि मूर्तीशेजारील माती यांच्याही ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

वाचकांना सूचना

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ (‘यू.टी.एस्.’) उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

४ आ. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

४ आ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : चाचणीतील घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

४ आ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

४ आ ३. श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील पाण्यामध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असणे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील पाण्यामध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आहे.

२. श्री भवानीदेवीच्या मूर्तीशेजारील मातीपेक्षा (१६.१२ मीटर) श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील मातीच्या (२८.०४ मीटर) सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ११.९२ मीटरने (२८.०४ मीटर – १६.१२ मीटर = ११.९२ मीटर) अधिक आहे.

४ आ ४. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

४ आ ४ अ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील पाण्याची एकूण प्रभावळ सर्वाधिक असणे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील पाण्याची एकूण प्रभावळ सर्वाधिक आहे.

२. श्री भवानीदेवीच्या मूर्तीशेजारील मातीपेक्षा श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील मातीची एकूण प्रभावळ २१.४६ मीटरने (४५.५१ मीटर – २४.०५ मीटर = २१.४६ मीटर) अधिक आहे.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४ आ ५’ मध्ये दिले आहे.

४ आ ५. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ आ ५ अ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील पाण्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असण्यामागील कारण : जानेवारी २०२० मध्ये श्री भवानीदेवीच्या देवळीचे बांधकाम चालू झाले, तेव्हा तेथे पाणी मुळीच लागले नव्हते; परंतु देवळीच्या जीर्णोद्धारासाठी देवीची मूर्ती देवळीतून बाहेर काढतांना मूर्तीखाली पाणी असल्याचे दिसून आले. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, श्री भवानीदेवीचे तत्त्व आपतत्त्वाशी संबंधित आहे. देवीच्या अस्तित्वाने तिच्या मूर्तीखाली आपोआप पाणी लागले. हे पाणी म्हणजे देवीचे ‘चरणतीर्थ’ आहे.

४ आ ५ आ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीखालील मातीमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असण्यामागील कारण : श्री भवानीदेवीची मूर्ती जागृत असल्याने तिच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. श्री भवानीदेवीच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे तिच्या मूर्तीखालील माती आणि मूर्तीशेजारील माती यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. मूर्तीशेजारील मातीपेक्षा मूर्तीखालील मातीमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे. याचे कारण हे की, देवीची मूर्ती चैतन्याचा मूळ स्रोत आहे. देवीच्या मूर्तीतून चैतन्य वातावरणात सतत प्रक्षेपित होते. त्यामुळे देवीच्या मूर्तीखालील मातीमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असल्याचे चाचणीतून दिसून आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

ई-मेल : [email protected]

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी देवतांचे चैतन्य कार्यरत असल्याने त्या ठिकाणची माती आणि पाणी यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आजपावेतो देश-विदेशातील अनेक ठिकाणांची माती आणि पाणी यांचे नमुने गोळा करून त्यांच्या चाचण्या केल्या आहेत. यांमध्ये प्रार्थनास्थळे (मंदिर, चर्च इत्यादी), भारतातील तीर्थक्षेत्रे, विविध जलस्रोत (समुद्र, नदी, जलाशय इत्यादी), मोठी शहरे इत्यादी समाविष्ट आहेत. यांपैकी भारतातील तीर्थक्षेत्रे आणि नद्या सोडून बहुतांश ठिकाणच्या माती अन् पाणी यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली; पण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेली माती आणि पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली. याचे कारण हे की, ‘भारतातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी कार्यरत असलेले देवतांचे चैतन्य !’ – सौ. मधुरा धनंजय कर्वे