श्री भवानीदेवीच्या मूर्तीला नवीन रंग दिल्यानंतर तिच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात श्री भवानीदेवीची एक सुंदर काळी पाषाणी मूर्ती आहे. वर्ष २०१८ मध्ये देवीच्या मूर्तीला नवीन (काळा) रंग देण्यात आला. ‘देवीच्या मूर्तीला नवीन रंग दिल्याने तिच्यातील चैतन्यावर काही परिणाम होतो का ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ (‘यू.टी.एस्.’) उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

नवीन रंग दिल्यानंतर चैतन्यमय झालेली श्री भवानीदेवीची मूर्ती

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत श्री भवानीदेवीच्या मूर्तीचा आधीचा रंग काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर, तसेच मूर्तीला नवीन रंग दिल्यानंतर, म्हणजे एकूण ३ टप्प्यांत मूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन – श्री भवानीदेवीच्या मूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ इ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीला नवीन रंग दिल्यानंतर तिच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे

२ ई. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ ई १. श्री भवानीदेवीच्या मूर्तीला नवीन रंग दिल्यानंतर तिच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे 

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

श्री. रामानंद परब

३ अ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीला नवीन रंग दिल्यानंतर तिच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ होण्यामागील कारण : श्री भवानीदेवीच्या मूर्तीमध्ये मुळातच चैतन्य आहे. त्यामुळे आरंभीही तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली. देवीची मूर्ती सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवण्यात आल्यानंतर साधक मूर्तीसमोर बसून नामजपादी उपाय करतांना देवीला भक्तीभावाने आळवीत, तेव्हा त्यांना देवीच्या संदर्भात विविध अनुभूती येत. कालांतराने देवीच्या मूर्तीला नवीन रंग देण्याचे ठरले. मूर्तीचे रंगकाम सनातनचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. रामानंद परब यांनी अतिशय भावपूर्णरीत्या केले. त्यांनी मूर्तीचे रंगकाम करतांना ‘मूर्तीच्या ठिकाणी साक्षात् श्री भवानीमाता विराजमान आहे’, असा भाव ठेवून रंगकामाची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण केली. ही सेवा करतांना त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. श्री. परब यांच्यातील भावामुळे त्यांनी रंगकामाची सेवा आरंभ केल्यापासून त्यांना विविध अनुभूती आल्या. मूर्तीचे रंगकाम पूर्ण झाल्यानंतर देवीच्या मूर्तीतील चैतन्यात पुष्कळ वाढ झाल्याचे चाचणीतूनही स्पष्ट झाले. यातून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेचे महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.१.२०२०)

ई-मेल : [email protected]