धर्मांतराविषयी ख्रिस्ती मिशनर्‍यांची पोलखोल केल्याने माझ्या जीविताला धोका ! – रघुराम कृष्णम राजू, खासदार, वाय.एस्.आर. काँग्रेस पक्ष

स्वपक्षातील नेत्यांकडूनच जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचा आरोप

संरक्षण देण्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडे मागणी

  • आंध्रप्रदेशमधील ख्रिस्तीधार्जिण्या राजवटीत एका हिंदु लोकप्रतिनिधीलाच जर अशी वागणूक मिळत असेल, तर राज्यातील सर्वसामान्य हिंदूंना कशी वागणूक मिळत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • अशा वेळी पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, धर्मांध, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे सर्वांची दातखिळी का बसते ?
  • केंद्र सरकाने आंध्रप्रदेशमधील हिंदुद्वेषी सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !
रघुराम कृष्णम राजू

तेलंगाणा – धर्मांतराविषयी ख्रिस्ती मिशनर्‍यांची पोलखोल केल्याने माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार आंध्रप्रदेशातील सत्ताधारी ख्रिस्तीधार्जिण्या वाय.एस्.आर. काँग्रेस पक्षाचे नर्सापुरम् लोकसभा मतदारसंघाचे खासदार रघुराम कृष्णम राजू यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली. ‘या प्रकरणी मला माझ्या पक्षाचेच आमदार आणि समर्थक यांच्याकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे’, असा आरोप त्यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे स्वतःला संरक्षण देण्याची मागणीही केली आहे.

रघुराम राजू पुढे म्हणाले की, ‘मला एका आमदाराने अक्षरशः अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या. याविषयी मी तक्रार करूनही काहीही झाले नाही. मी राज्यातील पोलीस-प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मला केंद्राकडे सुरक्षा मागावी लागत आहे.’

आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या २५ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती केली होती उघड !

ही आकडेवारी पहाता ‘आंध्रप्रदेशची वाटचाल ख्रिस्तीकरणाकडे झपाट्याने होत आहे’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ?

काही दिवसांपूर्वी रघुराम राजू म्हणाले होते की, ‘आंध्रप्रदेशमध्ये जर ख्रिस्ती मिशनरी इतरांचे धर्मांतर करत आहेत, तर त्याला मी काय करणार ?, आंध्रप्रदेशमध्ये धर्मांतराची प्रक्रिया जोरात चालू आहे; मात्र यात सरकारचा कुठलाही हात नाही. आंध्रप्रदेश राज्यात ख्रिस्त्यांची लोकसंख्या कागदोपत्री २.५ टक्क्यांहून अल्प आहे; परंतु प्रत्यक्षात ती २५ टक्क्यांहून अधिक आहे. जे समाजघटक अगोदरपासूनच लाभार्थी आहेत, त्यांना त्यांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारल्यावर मिळणारे लाभ बंद होतात. याच कारणामुळे ते जरी धर्मांतर करून ख्रिस्ती बनले, तरी ते सरकार दरबारी तशी नोंदणी करत नाहीत.’

तिरुपती मंदिरातील संपत्तीच्या लिलावालाही केला होता विरोध !

काही दिवसांपूर्वी आंध्रपदेशातील ‘तिरुपती तिरुमला देवस्थानम् बोर्ड’ने तिरुपती मंदिराच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयास रघुराम राजू यांनी ‘हा हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे’, असे सांगत विरोध दर्शवला होता. अन्य एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही त्यांनी मंदिर प्रशासनाला धारेवर धरले होते.