शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात भरती करण्याची विविध पक्षांच्या खासदारांची मागणी

कोरेगाव भीमा हिंसा प्रकरण

या खासदारांना नक्षलवादाचे आणि त्यामुळे होत असलेल्या जीवित अन् राष्ट्र हानीचे गांभीर्य नाही, असेच म्हणावे लागेल ! शहरी नक्षलवाद्याला अशा प्रकारे सहानुभूती दाखवणार्‍या या खासदारांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी कुणी शंका घेतली, तर त्यात चूक ते काय ?

शहरी नक्षलवादी वरवरा राव

मुंबई – कोरेगाव भीमा हिंसेप्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना कारागृहातून रुग्णालयात भरती करण्याची मागणी विविध पक्षांच्या १५ खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डी.एम्.के.च्या (द्रविड मुन्नेत्र कळघमच्या) खासदार कनिमोळी, आर्.जे.डी.चे (राष्ट्रीय जनता दलाचे) खासदार मनोज झा यांच्यासह १५ खासदारांनी हे पत्र लिहिले आहे. ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वरवरा राव यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे’, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राव यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

या आधी माजी माहिती आयुक्तानांही वरवरा राव यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. ‘जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तो पर्यंत आरोपीला निर्दोष मानले जावे, असा अपराधिक न्यायाचा सिद्धांत आहे; परंतु राव यांच्या प्रकरणात साक्षीदारच नसल्याने त्यांना कारागृहातून मुक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असे त्यांनी पत्रात म्हटले होते.