गौतम नवलखा याच्या जामीन याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्याचा देहली उच्च न्यायालयाला काय अधिकार ? – सर्वोच्च न्यायालय

शहरी नक्षलवादाचे प्रकरण

नवी देहली – देहली न्यायालयाकडून शहरी नक्षलवादाचा आरोप असणार्‍या गौतम नवलखा याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. ‘नवलखा याची जामीन याचिका आम्ही फेटाळून त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले असतांना या अर्जावर पुन्हा सुनावणी करण्याचा देहली उच्च न्यायालयाला काय अधिकार आहे ?’, असा प्रश्‍न या वेळी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. जानेवारी २०१८ मधील पुण्यातील कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी नवलखा याला अटक करण्यात आली आहे.