चीनशी असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलियावर सायबर आक्रमण

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाचेही चीनशी वाद चालू असतांना तेथील सरकारी, औद्योगिक, राजकीय पक्ष, शिक्षण आणि आरोग्य यांच्या संकेतस्थळांवर मोठे सायबर आक्रमण करण्यात आले आहे. या आक्रमणामागे चीनचा हात असल्याचा संशय ऑस्ट्रलियाकडून थेट नाव न घेता व्यक्त केला जात आहे. काही आठवड्यांपूर्वी चीनने ऑस्ट्रेलियाच्या एका नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.