कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ‘आर्सेनिक अल्बम् ३०’ हे होमिओपॅथी औषध घ्या !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

‘कोरोना’ या विषाणूंच्या संसर्गामुळे होणार्‍या आजारापासून आपले संरक्षण व्हावे किंवा त्याला प्रतिबंध व्हावा’, यासाठी आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात होमिओपॅथीचे ‘आर्सेनिक अल्बम् ३०’ हे औषध सुचवले होते. हे प्रतिबंधात्मक औषध सर्वत्रच्या साधकांनी आवर्जून घ्यावे.

या औषधाच्या गोळ्या ‘होमिओपॅथी मेडिकल’मध्ये उपलब्ध असतात.

१. औषध किती दिवस घ्यावे ?

या औषधाचे ३ ‘कोर्स’ करावेत. सलग ३ दिवस प्रतिदिन ५ गोळ्या घ्याव्यात. ‘३ दिवस औषध घेण्यात खंड पडणार नाही’, याची दक्षता घ्यावी. काही कारणांमुळे एखादा दिवस खंड पडला, तर पुढच्या (चौथ्या) दिवशी औषध घेऊ शकतो.

पूर्वी दिलेल्या सूचनेत ‘प्रति १० दिवसांनी हे औषध घ्यावे’, असे सांगितले होते; परंतु यापुढे साधकांनी १० दिवसांऐवजी ३० दिवसांच्या (१ मासाच्या) अंतराने कोर्स करावयाचा आहे. ज्या साधकांचा पहिला कोर्स करावयाचा आहे, त्यांनी प्रत्येक कोर्समध्ये ३० दिवसांचे अंतर ठेवून तिन्ही कोर्स पूर्ण करावेत. पहिला किंवा पहिले २ कोर्स पूर्ण झालेल्यांनीही उर्वरित कोर्सकरता ३० दिवसांच्या अंतराने औषध घेऊन राहिलेले १ किंवा २ कोर्स पूर्ण करावेत.

२. औषध कुणी आणि किती प्रमाणात घ्यावे ?

अ. ५ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलांना २ गोळ्या पाण्यात विरघळून द्याव्यात.

आ. ५ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांना ३ गोळ्या द्याव्यात.

इ. इतरांनी (९ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांनी) ५ गोळ्या घ्याव्यात. (गर्भवती महिला हे औषध घेऊ शकतात.)

३. औषध बनवण्याची पद्धत

‘आर्सेनिक अल्बम ३०’ हे औषध घालून सिद्ध केलेल्या गोळ्या किंवा द्रवरूपातील औषध ‘होमिओपॅथिक मेडिकल’मध्ये उपलब्ध असते. ते घेऊ शकतो. द्रवरूपातील औषध आणून तर्जनीच्या आकारातील बाटलीमध्ये साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या पूर्ण भरून घ्याव्यात. त्यामध्ये औषधाचे १० ते १२ थेंब घालावेत. नंतर औषध व्यवस्थित एकत्र करून गोळ्या घ्याव्यात.

४. अन्य महत्त्वाच्या सूचना

अ. सकाळी उठल्यावर चूळ भरून (दात न घासता) औषध घ्यावे. ‘या गोळ्यांना आपल्या हातांचा स्पर्श होणार नाही’, याची काळजी घ्यावी. गोळ्यांच्या डबीच्या झाकणामध्ये ५ गोळ्या घेऊन जिभेवर सोडाव्यात आणि त्या चघळून खाव्यात.

आ. औषध घेतल्यानंतर पुढील अर्धा घंटा काहीही खाऊ-पिऊ नये. त्यानंतर दात घासू शकतो आणि चहा, अल्पाहार आदी घेऊ शकतो. औषध घेतल्यानंतर अर्धा घंटा कापूर आणि अत्तर यांचे उपाय करू नयेत.

इ. सध्या काही साधक होमिओपॅथिक डॉक्टरांनी अन्य आजारांसाठी दिलेली औषधे घेत आहेत. साधकांनी ‘आर्सेनिक अल्बम ३०’ हे औषध घ्यायचे का ?’, हे संबंधित डॉक्टरांना विचारून घ्यावे.

ई. होमिओपॅथिक औषधांसह कोणत्याही वास असलेल्या पदार्थाचे सेवन केल्यास होमिओपॅथिक औषधांची कार्यक्षमता अल्प होते. काही मसाले, तसेच आयुर्वेदीय औषधे यांना तीव्र वास असतो. त्यामुळे ‘आर्सेनिक अल्बम’ हे औषध घेतांना संबंधित वैद्यांना विचारून त्या दिवसांपुरती (म्हणजे गोळ्या घेत असलेले ३ दिवस) आयुर्वेदीय औषधे बंद ठेवावीत. आयुर्वेदीय औषधे बंद ठेवणे शक्य नसेल, तर ‘आर्सेनिक अल्बम’ हे औषध घेतल्याच्या २ – ३ घंट्यांनंतर आयुर्वेदीय औषधे घ्यावीत.

उ. औषधाची बाटली कापूर, अत्तर, उदबत्ती, कॉफी, हिंग आदी उग्र गंध असलेल्या पदार्थांजवळ ठेवू नये.’

– आधुनिक वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१६.६.२०२०)