दळणवळण बंदीमुळे उत्पन्न बंद झाल्याने दुचाकी चोरणार्‍या पाद्य्राला अटक

  • अशी वृत्ते भारतातील तथाकथित निधर्मीवादी प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !
  • पाद्य्राच्या ठिकाणी एखादा पुरोहित असता, तर लगेच ती राष्ट्रीय बातमी झाली असती !

मदुराई (तमिळनाडू) – येथे ३६ वर्षीय विजयन् सॅमुअल या पाद्य्राला दुचाकी चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा थेनी येथे रहाणारा असून मदुराईच्या बाहेरील थानाक्कुलम् येथील ख्रिस्त्यांसाठी प्रार्थना सभागृह चालवत होता. या प्रार्थना सभागृहामध्ये अनेक जण येशू ख्रिस्ताकडे क्षमा (कन्फेशनसाठी) मागण्यासाठी येत असत. सभागृहात ‘कन्फेशन’ करणारे ख्रिस्ती या वेळी ते सॅमुअल याला अर्पण देत असत. हे मिळणारे अर्पण त्याचा आर्थिक स्रोत होता; मात्र कोरोनामुळे घातलेल्या दळणवळण बंदीमुळे त्याला प्रार्थनेमुळे मिळणारे अर्पण बंद झाले. सभागृहाचे प्रतिमासाचे १० सहस्त्र रुपयांचे भाडेही देऊ न शकल्याने त्याने रस्त्यावर उभ्या असणार्‍या दुचाकी चोरण्यास चालू केले होते. या दुचाकींची बनावट कागदपत्रे बनवून तो त्या विकत होता. जे पूर्वी त्याच्या सभागृहात प्रार्थनेसाठी येत होते, त्यांनाच त्याने या दुचाकी विकल्या होत्या.