सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी ८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ मे या एकाच दिवसात कणकवली तालुक्यातील डांबरे येथे ४, ढालकाठी येथे २, हिवाळे-मालवण येथे १, नाधवडे-वैभववाडी येथे १, असे एकूण ८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या आता १६ वर पोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी ८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यांतील ५ रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत, तर ३ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता नव्याने सापडलेल्या ८ कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.