सिंधुदुर्गात सरकारच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

मालवण – कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत ‘सिंधुदुर्ग जिल्हा, भाजप’च्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ काळी फित बांधून आंदोलन करण्यात आले. ‘कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यागपत्र द्यावे अन् पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

देवगड, मालवण आणि सावंतवाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या वेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ‘महाराष्ट्र वाचवा’ असे फलक हातात घेतले होते.