ठाणे अग्नीशमन दलातील सैनिकाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू

 

ठाणे – येथील अग्नीशमन दलातील सैनिक (फायरमन) मंगलसिंग राजपूत हे त्यांच्या बाळकुम येथील घरी दुचाकीवरून जात असतांना कोपरी पुलाजवळ ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.