‘कोरोना विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आणि आध्यात्मिक बळ मिळावे’, यासाठी पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेला नामजप करतांना विषाणू पळतांना दिसून श्री दुर्गामातेचे दर्शन होणे अन् चैतन्याची अनुभूती येणे

श्री. प्रताप सिंह वर्मा

‘२२.३.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेला कोरोना विषाणूविरुद्धचा ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री गुरुदेव दत्त । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप एक माळ करण्यासाठी मी दुपारी ३.४५ वाजता आरंभ केला. नामजप करतांना विषाणू (किड्यांच्या रूपात) पळतांना दिसले. नामजप करतांना साक्षात् श्री दुर्गामातेचे दर्शन झाले. दुर्गामाता मला म्हणाली, ‘मी सर्व साधकांचे रक्षण करणार आहे.’ नामजप करतांना जपमाळेतून पुष्कळ प्रमाणात चांगली स्पंदने निघत होती. नामजप करतांना चैतन्यामुळे जपमाळेतील मणी हलत होते. नामजप करतांना पुष्कळ चैतन्य मिळत होते आणि श्री दुर्गामातेच्या चरणी वारंवार कृतज्ञता व्यक्त होत होती.’

– श्री. प्रताप सिंह वर्मा, मथुरा (२२.३.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक