१३.९.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परिधान केलेली लाल रंगाची रेशमी साडी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात जड जाणवण्यामागील आध्यात्मिक कारणे !

‘१३.९.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परिधान केलेली लाल रंगाची रेशमी साडी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात जड झाल्याचे त्यांना आणि त्या साडी नेसतांना त्यांना साहाय्य करणार्‍या साधिका सौ. साक्षी जोशी यांना जाणवले. यामागील आध्यात्मिक कारणे येथे दिली आहेत.

१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या देवीच्या प्रकट शक्तीमुळे प्रथम त्यांनी नेसलेली साडी भारित होणे आणि नंतर देवीतत्त्वाच्या लहरी त्यांच्या साडीतून वातावरणात प्रक्षेपित होणे अन्  सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जड साडीचे वहन सहजतेने करता येणे

कु. मधुरा भोसले

१३.९.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या दिवशी चंडीदेवीने पाताळातील मोठ्या वाईट शक्तींशी घनघोर युद्ध केले. हे युद्ध करण्यासाठी तिची मारक शक्ती पुष्कळ प्रमाणात प्रकट होऊन कार्यरत झाली होती. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या देवीचे मूर्तीमंत रूप आहेत. चंडीयागाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये मारक रूपातील चंडीदेवी आणि तारक रूपातील भुवनेश्‍वरीदेवी या देवींचे तत्त्व आलटून-पालटून जागृत होत होते. या दोन्ही देवींकडून प्रक्षेपित होणारी तारक-मारक शक्ती ही नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात प्रगट होऊन कार्यरत झाली होती. देवींची ही प्रकट शक्ती सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहातून प्रक्षेपित होत होती. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहाला त्यांनी परिधान केलेल्या लाल रंगाच्या रेशमी साडीचा स्पर्श होत होता. रेशमाच्या सुतामध्ये उच्च देवतांच्या तत्त्वलहरी धारण आणि प्रक्षेपित करण्याची सर्वाधिक क्षमता असते. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या देवीच्या प्रकट शक्तीमुळे प्रथम त्यांनी नेसलेली रेशमी साडी भारित झाली आणि नंतर देवीतत्त्वाच्या लहरी त्यांच्या साडीतील धाग्यांतून वातावरणात प्रक्षेपित झाल्या. अत्याधिक प्रकट शक्ती धारण केल्यामुळे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या साडीमध्ये जडत्व निर्माण झाले. चंडीयज्ञाच्या वेळी होणार्‍या घनघोर सूक्ष्म-युद्धात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठीही देवीतत्त्वाने भारित झालेल्या त्यांच्या साडीने ढालीप्रमाणे कार्य केले. सद्गुरुताई देवीच्या प्रकट शक्तीशी पूर्णपणे एकरूप झाल्यामुळे त्यांनी जड झालेल्या साडीचा भार सहजतेने वहन केला. यावरूनच सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये देवीची प्रकट शक्ती सहन करण्याची विलक्षण क्षमता असल्याचे सिद्ध होते. दुसर्‍या दिवशी जेव्हा साडीतील प्रकट शक्ती अप्रकट झाली, तेव्हा त्यांची साडी हलकी जाणवू लागली.

२. शक्तीचा प्रकार, शक्तीच्या लहरींचे तापमान आणि त्यांचे वजन

३. विविध घटकांच्या लहरींचे तापमान आणि त्यांचे वजन

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०१९, रात्री १०.५५)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.