सांगलीत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ

अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त

सांगली – शामरावनगर परिसरातील काही वसाहतींमध्ये अनेक मास अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण विभागाने दुर्लक्ष केले. सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी अधिकार्‍यांना दूरभाष करून खडसावल्यावर महापालिकेने २ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीजवळ पाण्याची नवीन टाकी उभारण्यात आली. या टाकीतून पाणीपुरवठाही चालू झाला; पण पाणीप्रश्‍न सुटलेला नाही. यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.