आनंद तेलतुंबडे यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

मुंबई – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २२ मे या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने १४ दिवसांची वाढ केली.

कोरोगाव-भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवाद यांच्याशी प्रा. तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचे अनेक पुरावे यापूर्वी पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत. त्याविषयी अन्वेषण चालू असल्याचे या वेळी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून न्यायालयात सांगण्यात आले. याची नोंद घेत न्यायालयाने प्रा. तेलतुंबडे यांची न्यायालयीन कोठडी ५ जूनपर्यंत वाढवली आहे.