बहराईच (उत्तरप्रदेश) येथे दळणवळण बंदीचे उल्लंघन करत मशिदीमध्ये नमाजपठण करणार्‍यांकडून पोलिसांवर दगडफेक

२ पोलीस गंभीररित्या घायाळ,  दगडफेक करण्यामध्ये महिलाही सहभागी

  • देशात आतापर्यंत अशा प्रकारच्या इतक्या घटना घडल्यानंतरही जागे न होता सतत मार खाणारे पोलीस काय कामाचे ?
  • अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बहराईच (उत्तरप्रदेश) – येथील कटका गावातील छौंकन मशिदीमध्ये दळणवळण बंदीचे उल्लंघन करत शुक्रवार, २२ मे या दिवशी नमाजपठण करण्यास जमलेल्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी दगडफेक केली. यात २ पोलीस गंभीररित्या घायाळ झाले. याची माहिती मिळाल्यावर अतिरिक्त पोलीस फौजफाटा आल्यावर ९ पुरुष आणि ४ महिला अशा १३ जणांना अटक करण्यात आली. पोलीस शिपाई विनय कुमार आणि रामप्रवेश यांनी नमाजपठणास विरोध केल्यावर येथील गावकरी एकत्र आले आणि त्यांना पोलिसांशी वाद घातला. या वेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी या दोघांवर दगडफेक केली. त्यामुळे ते दोघेही तेथून पळून गेले.